Home अकोले Bhandardara Dam Overflow: भंडारदरा धरण ओव्हरफ्लो, पाणी सोडण्यास सुरुवात

Bhandardara Dam Overflow: भंडारदरा धरण ओव्हरफ्लो, पाणी सोडण्यास सुरुवात

Bhandardara Dam Overflow

अकोले | Bhandardara Dam Overflow: उत्तर नगर जिल्ह्यातील वरदान असलेले  भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

धरणात होत असलेल्या नवीन पाण्याची आवक लक्षात घेता या धरणातील पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणाच्या सांडव्यातून २४३६ क्युसेस व विद्यूतगृहाद्वारे ८२० क्युसेस असा एकुण ३२५६ क्युसेस विसर्ग प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे. निळवंडे धरणही ८५ टक्के भरले आहे. भंडारदरा धरणातून पाण्याची आवक सुरू झाली असून ते येत्या दोन दिवसात तेही भरणार आहे. . आढळा धरण ५५ टक्के भरले आहे.

पावसाचा जोर वाढल्यामुळे मोठी पाण्याची आवक सुरु आहे. विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होऊ शकते. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या रहिवाश्यांनी आपली तसेच आपल्या पशुधनाची व शेती अवजारांची काळजी घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार चालू असल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. तसेच आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसाने आदिवासी भागातील शेतीकामांना पुन्हा वेग आला आहे. तसेच या सततच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मात्र करोनामुळे पर्यटकांवर मोठा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. तालुक्यात सर्वच भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे

Web Title: Bhandardara Dam Overflow

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here