Home अहमदनगर कारच्या चाकाखाली कोंबडी आली अन झाले असे काही

कारच्या चाकाखाली कोंबडी आली अन झाले असे काही

Crime News Something happened to the chicken under the wheel of the car

श्रीरामपूर | Shrirampur | Crime News:  कोंबडी कारच्या चाकाखाली आल्याने तिचा मृत्यू झाल्याने परस्परविरोधी गुन्हे श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. 

श्रीरामपूर परिसरातील आठवाडी एकलहरे येथे कोंबडी कारच्या चाकाखाली आल्याने  तिचा मृत्यू झाल्याने गाडी चालक गाडी बाहेर आला नाही म्हणून त्यास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच त्याला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सदर प्रकार हा सकाळी घडला.  याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एकलहरे परिसरात आठवाडी परिसरात सॅन्ट्रो कार नं. एमएच 04 डिआर 508 या गाडीखाली कोंबडी चिरडून मृत्युमुखी झाली.  तेव्हा गाडी चालक सय्यद हा गाडीबाहेर आला नाही त्यावरुन तिघांनी सय्यद याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. कारच्या मागच्या बाजूला पत्र्यावर मारुन इंडिकेटरचे नुकसान केले.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नवाब सय्यद (वय 36) रा. आठवाडी, एकलहरे, ता. श्रीरामपूर यानी फिर्याद दिली आहे. यानुसार पोलिसांनी रविंद्र भानुदास बर्डे, सपना रविंद्र बर्डे, मंगल नाना बर्डे सर्व रा. आठवाडी, एकलहरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी फिर्याद रविंद्र भानुदास बर्डे यांनी फिर्याद दिली असून आरोपी नवाब सय्यद, रा. आठवाडी, एकलहरे याच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

रविंद्र बर्डे या तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी सय्यद याच्या गाडीखाली कोंबडी मयत झाली तेव्हा त्याच्याकडे विचारणा केली असता सय्यद याने वाईट शिवीगाळ करून धमकी दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. लोटके हे करीत आहेत.

Web Title: Crime News Something happened to the chicken under the wheel of the car

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here