श्रीगोंदा | Ahmednagar: श्रीगोंदा तालुक्यातील नगर दौंड महामार्गावर असलेल्या काष्टी येथे धक्कादायक घटना घडली असून दोन भावामध्ये झालेल्या वादात एक भावाने पाईपाने मारहाण केली तर दुसऱ्या भावाने आपल्याकडील रिव्हॉल्व्हर मधून गोळीबार करत जखमी केले आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली .
काष्टी येथील संजीवनी हॉस्पीटल समोर दोघा भावांची मारामारी झाली. मनोज मुनोत याने आपल्या भावाला पाईप मारला तर त्यांचे भाऊ डॉ. विजय मुनोत याने आपल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. या गोळीबारात मनोज मुनोत यांना एक गोळी लागली आहे .
काष्टी येथे विजय मुनोत यांचा वैद्यकिय व्यावसाय आहे तर मनोज मुनोत यांचा किराणा विक्रीचा व्यावसाय आहे. डॉ. विजय मुनोत यांचे हॉस्पीटल असून त्याच्याच समोर मनोज मुनोत यांचा किराणा विक्रीचा व्यवसाय आहे.
बुधवारी सकाळी साडे दहाच्या दरम्यान मनोज मुनोत यांच्या दुकानात विक्रीचे साहित्य घेऊन एक टेम्पो आला होता. टेम्पो चालकाने सदर टेम्पो डॉ. मुनोत यांच्या हॉस्पीटलसमोर उभा केला होता.
टेम्पो माझ्या दवाखान्यासमोर का उभा केला असले म्हणून डॉ. विजय मुनोत यांनी मनोज मुनोत यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर दोन्ही भावांमध्ये वाद निर्माण झाले.
याबाबत घटनास्थळी श्रीगोंदा पोलीस निरीक्षक रामराम ढिकले व पोलिसांचे पथक पोहचले असून गोळी लागलेल्या व्यक्तीला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. अजून पर्यंत श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: Ahmednagar Number one brother firing on brother