Home अहमदनगर Crime: महिलेचा विनयभंग व हात पाय तोडण्याची धमकी

Crime: महिलेचा विनयभंग व हात पाय तोडण्याची धमकी

Crime News Woman molested and threatened to break limbs

Ahmednagar News Live | Crime News | अहमदनगर: अहमदनगर शहरातील महिलेसोबत गैरवर्तन करून तिला कुर्‍हाडीने हातपाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात सचिन काशिनाथ वाघमारे (रा. कोठला, अहमदनगर) याच्याविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला ही 29 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी पारनेर तालुक्यातील एका गावात राहत असलेल्या तिच्या आईला भेटून तिच्या घरी अहमदनगर शहरात आली.

त्यावेळी वाघमारे हा फिर्यादी महिलेच्या घरी आला. तुझी मैत्रिण कुठे आहे सांग नाही, तर तुझे हातपाय कुर्‍हाडीने तोडून टाकीन, अशी धमकी देत त्याने महिलेचा हात पिरगळून मारहाण केली. तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. पीडिताने याबाबततिच्या जावयास माहिती दिली असता,  वाघमारे याने त्यांनाही शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Crime News Woman molested and threatened to break limbs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here