Home अहमदनगर अल्पवयीन मुलीला मुंबईला पळवून नेत तिच्यावर अत्याचार

अल्पवयीन मुलीला मुंबईला पळवून नेत तिच्यावर अत्याचार

Ahmednagar minor girl was abducted in Mumbai and tortured

Ahmednagar News Live | अहमदनगर: एका खासगी हॉस्पिटलमध्ये कामाला असलेल्या अल्पवयीन मुलीला त्याच  हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या तरुणाने मुंबईला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार (abducted) केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या युवकाला अटक करण्यात आली आहे.  सलमान बशीर शेख वय २१ रा. हल्ली रा, कोठला असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात मिसिंगचा गुन्हा दाखल होता. यामध्ये वाढीव कलम लावण्यात आले आहे, पिडीत मुलीने व आईने तसा जबाब नोंदविला आहे.

पिडीत अल्पवयीन मुलगी एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करीत होती. यावेळी तिची सलमान सोबत ओळख झाली. सलमानने तिच्यासह घरच्यांना धमकावत तिला मुंबईला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याबाबत घरच्यानी मिसिंगची तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याने पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी तपासाची सूत्रे फिरवली. त्यांच्या पथकाने अल्पवयीन मुलीसह आरोपीचा शोध घेतला. त्यांना शोधून पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

Web Title: Ahmednagar minor girl was abducted in Mumbai and tortured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here