Home क्राईम संगमनेर तालुक्यात पोलीस बंदोबस्तात शेताची मोजणी सुरु असताना हाणामारी, २० जणांवर गुन्हा...

संगमनेर तालुक्यात पोलीस बंदोबस्तात शेताची मोजणी सुरु असताना हाणामारी, २० जणांवर गुन्हा  

Crime Fighting in Sangamner taluka while counting of farms

Ahmednagar News Live | Sangamner Crime | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील नानज दुमाला येथे शेताची सरकारी मोजणी पोलीस बंदोबस्तात सुरु नोंदणी करायची नाही असे म्हणत झालेल्या वादातून २० जणांनी एकास बेदम लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून तब्बल २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुदाम कारभारी गीते यांनी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत म्हंटले आहे की, माझे नानज दुमाला ता. संगमनेर गावाचे शिवारात शेत गट नंबर ३७९ मध्ये एक हेक्टर २९ आर शेती असून माझे आई वडील व चुलते शेतातच वस्ती करून राहतात. आमचे क्षेत्र कमी भरत असल्याने आम्ही सरकारी मोजणी करून घेतली होती. व काल दिनांक २९-१२-२०२१ रोजी भूलेखन कार्यालयाची मोजणी अधिकारी भोईरे साहेब खुणा करून देण्यासाठी आले होते. व सदर मोजणीदरम्यान पोलीस बंदोबस्त हजर होता. काल दिनांक २९ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मोजणी अधिकारी भोईरे साहेब खुणा दाखवत असताना तेथे संदिप देवराम गीते आला. त्याने माझ्या तोंडात मारून, मला शिवीगाळ करून ते क्षेत्र आमचे आहे व मोजणी करायची नाही. असे म्हणाल्याने मिलिंद भोईरे याने टेप गुंढाळून घेतला. व आम्ही घराकडे येताना रावबा चिमाजी गीते, संदीप देवराम गीते, देवराव चिमाजी गीते ,सहादू भिमाजी गीते, संतोष सहादू गीते, पुंजा भाऊ पाटील गीते. रोहिणी पुंजा गीते, शुभम पुंजा गीते, भागवत भिमाजी गीते, रोहिदास भागवत गीते, सचिन भागवत गीते, दगडू कारभारी गीते, विलास पाटीलबा सांगळे, समाधान दगडू गीते, बाळू गीते, रंजना गीते, ताई गीते, रंजना भागवत गीते, सुमन गीते, सुभाष गीते, सर्व रा. सोनुशी ता. संगमनेर यांनी मला घेराव घालून लाथाबुक्क्यांनी माझ्या पोटात व डोक्यात खाली पडून माझ्या पाठीवर व हातापायांवर मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच पुन्हा आमच्या जमिनीत आला तर हात पाय तोडून टाकू असा दम दिला. व माझ्या डोक्यात मारहाण केली. तेव्हा माझे नातेवाईकांनी येऊन त्यांच्या तावडीतून सोडविले. डोक्यात मारहाण केल्याने ते बेशुद्ध झाले असल्याने संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले. वरील फिर्यादीवरून २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.   

Web Title: Crime Fighting in Sangamner taluka while counting of farms

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here