अहमदनगर जिल्ह्यात नव्या वर्षात नवे कडक निर्बंध लागू
Ahmednagar News Live | अहमदनगर: करोनाचा वाढता संसर्ग आणि ओमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यात विवाह समारंभ, मेळावे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अथवा धार्मिक कार्यक्रमातील उपस्थिती ५० पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. तसेच अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० व्यक्तीपर्यंत मर्यादित ठेवण्याचे आदेश राज्य सरकार पाठोपाठ जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी काढले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात नववर्षाचे स्वागत करताना धार्मिक स्थळं, पर्यटन स्थळं तसेच कोणत्याही कार्यक्रमात, नागरिकांची जास्त गर्दी होणार नाही तसेच, सामाजिक अंतर पाळले जाईल व कोविडच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याबाबत स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक असल्याच्या सूचना डॉ. भोसले यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी, प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत डॉ. भोसले बोलत होते.
Web Tile: Strict restrictions on growing corona in Ahmednagar