Home Accident News उभ्या ट्रेलरला क्रुझरची धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू, दोन लहान बालके….

उभ्या ट्रेलरला क्रुझरची धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू, दोन लहान बालके….

Breaking News | Solapur Accident: पाठीमागून क्रुझर जीपने जोराचे धडक दिली आणि भीषण अपघात, पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात वाहन चालक, दोन लहान बालके गंभीर जखमी.

Cruiser collides with stationary trailer, husband and wife die on the spot

सोलापूर: सोलापूर-कोल्हापूर महामार्गावर मंगळवेढा तालुक्यातील आंधळगावजवळ झालेल्या भीषण अपघातात (Accident) पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात वाहन चालक, दोन लहान बालके गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

सचिन कुंभार (वय २५) आणि लक्ष्मी कुंभार वय (वय २४) या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत झालेलं दोघे पती पत्नी अफजलपुर (जिल्हा विजयपुर, कर्नाटक) येथील आहेत.

यांबाबत माहिती अशी की, मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास आंधळगावजवळ पवनचक्कीचे साहित्य घेऊन चाललेला ट्रेलर थांबला होता. पाठीमागून क्रुझर जीपने जोराचे धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला. क्रूजर गाडी ही कर्नाटक राज्यातील असून के. ए. २७ बी ८१८८ असा या गाडीचा नंबर आहे.

मंगळवारी पहाटे झालेला अपघात इतका भीषण होता की क्रुझरच्या समोरचा भाग त्या ट्रेलरच्या खाली घुसला होता. मदत कार्य करणाऱ्यांनी जेसीबी बोलावून क्रुझरला ओढून बाहेर काढले. जखमी ड्रायव्हर आणि दोन लहान बालकांना बाहेर काढावे लागले. दोन लहान बालके आणि ड्रायव्हरला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Web Title: Cruiser collides with stationary trailer, husband and wife die on the spot

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here