Home संगमनेर संगमनेर: मुळा नदीपात्रात पाण्यावर तरंगताना आढळला मृतदेह

संगमनेर: मुळा नदीपात्रात पाण्यावर तरंगताना आढळला मृतदेह

Breaking News | Sangamner: मुळा नदीपात्रात ५० ते ५२ वर्षीय इसमाचा मृतदेह (Dead body) पाण्यावर तरंगताना आढळून आला.

Dead body was found floating on the water in the Mula riverbed

संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील स्मशानभूमी परिसरातील मुळा नदीपात्रात ५० ते ५२ वर्षीय इसमाचा मृतदेह मंगळवार दिनांक २७ रोजी सकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आला.

घारगाव येथील रहिवासी असलेल्या साहेबराव पांडुरंग आहेर हे रविवारपासून बेपत्ता असल्याचे बोलले जात होते. आज मंगळवार दि. २७ रोजी सकाळी काही नागरिकांनी स्मशानभूमी परिसरात गेले असता नदी पात्रालगत कपडे आढळून आले. व आहेर यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल महादेव हांडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Dead body was found floating on the water in the Mula riverbed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here