Home अहमदनगर अहमदनगर: सैनिकाच्या पत्नी व मुलाचा घरात मृतदेह आढळला

अहमदनगर: सैनिकाच्या पत्नी व मुलाचा घरात मृतदेह आढळला

Breaking News | Ahmednagar: सैनिकाच्या पत्नी व मुलाचा राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने भिंगार परिसरात खळबळ उडाली. गळफास घेतल्याचा संशय

Dead bodies of soldier's wife and son were found in the house

अहमदनगर: सैनिकाच्या पत्नी व मुलाचा राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने भिंगार परिसरात खळबळ उडाली आहे. राणी बाळकृष्ण तिकोणे (वय ३२) व तिचा मुलगा स्वराज बाळकृष्ण तिकोणे (वय ८, दोघे रा. साईश्रद्धा अपार्टमेंट, जामखेड रस्ता, नगर) अशी मृतांची नावे आहेत. काल, शुक्रवार (दि. २९) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भारतीय सैन्य दलाच्या बीएसएफमध्ये ओडिसा येथे नोकरीला असलेल्या बाळकृष्ण तिकोणे यांची पत्नी राणी व मुलगा स्वराज नगर शहरातील जामखेड रस्त्यावरील साईश्रद्धा अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांचे दोघांचे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह काल सायंकाळी राहत्या घरात मिळून आले. याबाबतची माहिती सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भिंगार कॅम्प पोलिसांना मिळताच सहा. पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राणी व मुलगा स्वराज यांनी गळफास घेण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: Dead bodies of soldier’s wife and son were found in the house

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here