Home अहमदनगर रोडवर अज्ञात २५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला

रोडवर अज्ञात २५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला

Dead body of an unidentified 25-year-old youth was found on the road

नेवासा | Newasa: नेवासा ते शेवगाव रोडवर अपघातात मयत झालेल्या अज्ञात अंदाजे 25 वर्षे वयाच्या युवकाचा मृतदेह (Dead body) आढळून आला. अपघातात मयत झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक भागवत अशोक शिंदे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 4 जून रोजी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास हंडीनिमगाव शिवारात नेवासा ते शेवगाव रोडवर दत्तगुरु हायटेक नर्सरीसमोर रस्ते अपघातात मयत स्थितीत अंदाजे 25 वर्षे वयाचा अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला.

या इसमाचे वर्णन आणि संपर्क साधण्याचे आवाहन:

उंची 5 फूट 5 इंच, रंग निमगोरा, नाक सरळ, अंगाने सडपातळ, अंगात फिक्कट राखाडी पॅन्ट, लाल रंगाचा शर्ट, हाताच्या उजव्या कांबीवर शंकर कविता व ओम तसेच लव गोंदलेले आहे. तर डाव्या हाताच्या कांबीवर इंग्रजीत अस्पष्ट गोंदलेले दिसत आहे. सदर युवकाबद्दल कोणाला काही माहिती असल्यास नेवासा पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Dead body of an unidentified 25-year-old youth was found on the road

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here