Home संगमनेर संगमनेर: पावसाने झोडपले, गायी दगावली, पत्रे उडून दोघे जखमी

संगमनेर: पावसाने झोडपले, गायी दगावली, पत्रे उडून दोघे जखमी

Sangamner rain hit, the cows died, the leaves flew and both were injured

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यात काही भागात मान्सूनपूर्व पाउस (rain) झाला. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी अडीच वाजल्यापासून संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कोठे बुद्रुक परिसरात वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे काहींच्या घरावरील पत्रे उडून गेले तर झाले उन्मळून पडली. तसेच आंब्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील पठार भागात कोठे बुद्रुकसह अन्य भागात मान्सून पूर्व वादळी वाऱ्यासह पाउस झाला. वादळी वारे असल्यामुळे शेतकऱ्यांचे झाडे उन्मळून पडली. तर आंब्यांचे मोठे नुकसान झाले. लहू बबन वाकळे यांच्या आंब्याच्या झाडाखाली बांधलेल्या एका गायीवर झाड पडल्याने तिचा मृत्यू झाला. सुनील मार्तंड आरोटे व कैलास धुमाळ यांच्या घराच्या छतावरील पत्रे जवळपास अडीचशे ते तीनशे फुटापर्यंत उडाल्याने घरातील धान्य व संसारपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. धुमाळ यांचे कुटुंब घरात होते. पत्रे उडाल्याने धुमाळ व त्यांच्या मुलीच्या अंगावर विटा पडल्याने दोघे जखमी झाले आहेत.

दरम्यान पडझड झालेल्या भागांची राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली असून पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अहवाल तयार करून शासनाला तातडीने पाठवा अशा सूचना केल्या आहेत.

Web Title: Sangamner rain hit, the cows died, the leaves flew and both were injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here