Home नाशिक Crime : प्रेमसंबंधातून तरुणीवर धारदार शस्त्राने वार

Crime : प्रेमसंबंधातून तरुणीवर धारदार शस्त्राने वार

Crime Filed young woman was attacked with a sharp weapon during a love affair

नाशिक रोड | Nashik Crime: देवी चौक येथील एका सराफाच्या दुकानातील तरुणीने प्रेमसंबंधातून बोलणे बंद करून टाळाटाळ केल्याने संतापलेल्या प्रेमवीराने तरुणीस शिवीगाळ करून मारहाण व धारदार वस्तूने हातावर वार करीत जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

शुभम अरुण घोलप वय २२ जेल रोड असे संशियीत आरोपीचे नाव आहे.  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत युवती देवी चौकातील एका सराफाच्या दुकानात कामाला आहे, पीडिता बुधवारी दुपारच्या सुमारास काम करीत असताना संशियीत प्रियकर घोलप तिच्यापाशी आला. पिडीतेने काही दिवसांपासून बोलणे बंद केले होते. त्याविषयी शुभमने विचारणा करीत मारहाण केली. त्यानंतर कटर सारख्या धारदार वस्तूने युवतीच्या हातावर वार करून दुखापत केली.

Web Title: Crime Filed young woman was attacked with a sharp weapon during a love affair

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here