Home अकोले आढळा नदीत बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह सापडला

आढळा नदीत बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह सापडला

Akole News: केळी -रुम्हणवाडी येथे आढळा नदीत पोहायला गेलेल्या तरुण बुडाल्याची घटना रविवारी घडली. तो मृतदेह अथक परिश्रमा नंतर दोन दिवसांनी सापडण्यात पोलीस आणि नातेवाईकांना यश.

Dead body of 'that' young man who drowned in the Adhala river was found

अकोले:  अकोले: तालुक्यातील केळी -रुम्हणवाडी येथे आढळा नदीत पोहायला गेलेल्या तरुण बुडाल्याची घटना रविवारी घडली होती.  त्या तरुणाचा मृतदेह मिळून आला नव्हता अखेर तो मृतदेह अथक परिश्रमा नंतर दोन दिवसांनी सापडण्यात पोलीस आणि नातेवाईकांना यश आले आहे.

सिन्नर तालुक्यातील दोडी येथील गरीब कुटुंबातील दत्तू मोरे हा तरुण वीटभट्टीवर काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, रविवारी तो आढळा नदीत पोहण्यास उतरला होता. अंगातील सदरा काढली आणि जिन्स विजारच त्याने पाण्यात डुबकी घेतली.

त्यावेळी त्याचा पाय विजारीत अडकल्याने तो 20 ते 25 फूट खोल पाण्यात राहिला. अखेर श्वास गुदमरुन त्याचा मृत्यू झाला. असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी अकोले पोलीस, स्थानिक नातेवाईक आणि बाहेरुन पाचारण करण्यात आलेले पथक परिश्रम घेत होते. शेवटी स्थानिक तरुण अमोल मेंगाळ व हर्षल मेंगाळ यांनी गळ टाकून 48 तासांच्या अथक शोधकार्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले आहे.

Web Title: Dead body of ‘that’ young man who drowned in the Adhala river was found

Also See: Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here