Home अकोले अखेर संकेत नवलेच्या खुनाचा उलगडा, दोघांना अटक

अखेर संकेत नवलेच्या खुनाचा उलगडा, दोघांना अटक

Sanket Nawale Murder Case Two Arrested: अत्यंत नाजूक व आर्थिक देवाण घेवाणीतून संकेतची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर.

Sanket Nawale Murder Case Two Arrested

संगमनेर: अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथील रहिवासी असलेला संकेत नवले हा विद्यार्थी संगमनेरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याचा मृतदेह संगमनेर शहरातील सुकेवाडी रस्त्यावरील नाटकी नाल्यात आढळला होता. त्याच्या डोक्यावर जखमा आढळल्याने त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. संकेत याचा धारदार हत्याराने खून करून मृतदेह शहरातील पुनर्वसन कॉलनी परिसरातील नाटकी नाल्यात फेकून देण्यात आला होता. दि. ८ डिसेंबर रोजी हा प्रकार घडला होता. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला होता. पोलिसांनी त्याची रुम शोधली, त्याचे मित्र कोण आहेत याची चौकशी केली.

या घटनेचा अतिशय गुप्त पध्दतीने तपास सुरू असताना आज 9 फेब्रुवारी 2023 रोजी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. शाहरुख हसन शेख (वय 22) व सलमान इमाम शेख (वय 30, रा. पुनरवसण कॉलनी, कुरण रोड संगमनेर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. अत्यंत नाजूक व आर्थिक देवाण घेवाणीतून संकेतची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र या अटक सत्रानंतर आरोपींच्या कुटुंबियांनी आमच्या मुलांना नाहक या प्रकरणात अडकविण्याचा आरोप पोलिसांवर केला आहे. आज या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, संकेत नवले आणि आरोपी शाहरुख शेख व सुलतान शेख ही तिघे पुर्वीपासून एकमेकांचे मित्र होते. त्यांच्यातील मैत्री इतरांपेक्षा वेगळी होती. दरम्यान दि. 3 डिसेंबर 2022 रोजी आरोपींनी संकेतशी संकेतीक भाषेत संपर्क करून त्याला सुकेवाडी परिसरात भेटायला बोलावले होते. तेथे त्यांच्यात चर्चा झाली मात्र, तिघांमध्ये एका नाजुक कारणाहून मतभेद झाले आणि तेथेच बाचाबाची आणि धक्काबुकी आणि नंतर शाहरुख शेख व सुलतान शेख या दोघांनी मिळून संकेतची हत्या केली. त्यानंतर हा खून लपविण्यासाठी व पुरावे नष्ट करण्यासाठी थंड डोक्याचा वापर करून त्याला सुकेवाडी परिसरातच नेवून टाकले ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी व या खूनाचा तपास लावण्यासाठी दिवस रात्र एक करीत तपास सुरु होता मात्र तपास लागत नव्हता. अनेक ठिकाणाची सीसीटीव्ही तपासले आणि यात हे संशयित आरोपींच्या हालचाली टिपल्या गेल्या मात्र ठोस काही हाताला लागत नव्हते. या आरोपींना या अगोदर दोन ते तीन वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र चौकशी करून सोडून देण्यात आले. दरम्यान आजही अशीच चौकशी होईल म्हणून सदर आरोपी बिनधास्तपणे चौकशीसाठी हजर झाले परंतु यावेळी मात्र उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाला ठोस पुरावे मिळाले होते त्यामुळे आलेल्या या दोघांना खूनाच्या गुन्ह्यात अटक केली असून तुरुंगात रवानगी केली आहे.

Web Title: Sanket Nawale Murder Case Two Arrested

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here