Home महाराष्ट्र पंधरा दिवसात महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये खांदेपालट होणार का ?

पंधरा दिवसात महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये खांदेपालट होणार का ?

Congress in Maharashtra: बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा पाठवल्यानंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीवारी सुरू.

Will there be a shift in Congress in Maharashtra

मुंबई: सत्यजित तांबे प्रकरणावरून काँग्रेसमध्ये सुरू झालेला अंतर्गत कलह वाढताना दिसून येत आहे. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा पाठवल्यानंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीवारी सुरू झाल्या आहेत. बाळासाहेब थोरात आपल्या राजीनाम्यावरती ठाम आहेत. तसेच वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून कळविले आहे. तर दुसरीकडे नाना पटोले यांच्या तक्रारींमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल स्व पक्षातील काँग्रेसचे नेत्यांची काही प्रमाणात नाराज तर आहेत. मात्र महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची ही नाराजी पाहायला मिळते. पुढील पंधरा दिवसात महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये खांदेपालट होणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत कलह कमी होण्याऐवजी वाढताना पाहायला मिळतोय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा हाय कमांडकडे पाठवल्यानंतर ते या राजीनाम्यावर ठाम आहेत. तर त्यांची मनधरणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राज्यातील नेते प्रयत्न करीत आहे.

बाळासाहेब थोरात यांची समजूत काढण्याबरोबरच बाळासाहेब थोरात यांच्यावरती अन्याय कसा झाला आणि नाना पटोले कसे चुकीचे आहेत. दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसचे काही नेते वारंवार करताना पाहायला मिळतात. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात राज्यात काँग्रेसची एकफळी निर्माण होताना पाहायला मिळते.

नाना पटोले आणि थोरात प्रकरणानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांची दिल्लीवारी सुरू झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीत जाऊन ठाण मांडले आहे. थोरात यांच्या गटनेतेपदाचा राजीनामा मंजूर झाला तर अशोक चव्हाण आणि त्यांच्या गटाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Will there be a shift in Congress in Maharashtra

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here