Home महाराष्ट्र खळबळजनक: शिवशाही बसमध्ये आढळला मृतदेह

खळबळजनक: शिवशाही बसमध्ये आढळला मृतदेह

Dead Body found in Bus: शिवशाही बसमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

Dead body found in Shivshahi bus

कराड: कराड येथील बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तात्काळ घटनास्थळी कराड शहर पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

घटनास्थळावरून व शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड बसस्थानकरात गेल्या 15 दिवसापासून एकाच जागेवर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सदरील व्यक्तीचे वय अंदाजे 45 ते 50 असावे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री उशिरा स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला.

कराड बसस्थानक परिसरात आढळून आलेल्या मृतदेहाबाबत घातपात झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कदाचित गारठ्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे. तरीही शवविच्छेनद अहवाल आल्यानंतर अधिक माहिती समोर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: Dead body found in Shivshahi bus

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here