Home पुणे धक्कादायक! कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून २३ वर्षीय तरूणीवर बलात्कार

धक्कादायक! कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून २३ वर्षीय तरूणीवर बलात्कार

Pune Crime News:  कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून २३ वर्षीय तरूणीवर बलात्कार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

23-year-old girl rape by putting gungy drug in cold drink

पुणे: पुण्यातील सहकार नगर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून २३ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी २३ वर्षीय पीडित तरुणीने या संदर्भात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अभिमन्यु दिलीप शेरेकर, उदयन दिलीप शेरेकर, दिलीप शेरेकर, प्रशांत कोली, कपील, सागर यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  पीडित तरुणी आणि अभिमन्यू शेरेकर हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. शेरेकरने एकेदिवशी पाडितेला घरी बोलावले होते आणि कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावर न थांबता त्याने पीडितेचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला.

एप्रिल २०२२ मध्ये अभिमन्यूच्या मित्र प्रशांत कोळीने पीडितेला ठाण्याला नेले आणि जबरदस्तीने अभिमन्युबरोबर लग्न लावले. पीडितेने फोटो डिलीट करण्याचे सांगितले असता अभिमन्युचा भाऊ उदयन शेरेकर आणि वडिल दिलीप शेरेकर यांनी तिला मारहाण केली. तसेच आईवडिलांना मारुन टाकू अशी धमकी दिली.

या सर्व त्रासाला कंटाळून पीडितेने सहकारनगर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: 23-year-old girl rape by putting gungy drug in cold drink

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here