Home क्राईम आरपीएफ इन्स्पेक्टरची जवानाने केली हत्या, धक्कादायक कारण आले समोर

आरपीएफ इन्स्पेक्टरची जवानाने केली हत्या, धक्कादायक कारण आले समोर

Kalyan Murder Case: इन्क्रीमेंट रोखल्याच्या रागातून आरपीएफ जवानाने आरपीएफ इन्स्पेक्टर यांची हत्या केल्याची घटना.

RPF inspector Murder by jawan

कल्याण: चार वर्षापूर्वी इन्क्रीमेंट रोखल्याच्या रागातून आरपीएफ जवानाने आरपीएफ इन्स्पेक्टर बसवराज गर्ग यांची हत्या (Murder) केल्याची घटना काल रात्री कल्याण रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या वसाहतीत घडली आहे. हत्या करणाऱ्या आरपीएफ जवाना पंकज यादवाला कोळसेवाडी पोलिसांनी पेण येथून पहाटे तीन वाजता अटक केली आहे. त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसरावराज गर्ग हे आरपीएफच्या सब इन्स्पेक्टर पदावर कार्यरत होते. ते कल्याण रेल्वे स्थानकालगत असलेल्या पूर्व भागात रेल्वे वसाहतीत राहत होते. काल रात्री ते राहत असलेल्या बॅरेक्समध्ये मोबाईलवर गाणी एकत बसले होते. त्याचवेळी अचानक आरपीएफ जवान पंकज त्याठिकाणी आला. त्याने हातातील लाकडी दांडक्याने आणि ठोशा बुक्क्यांनी बसवराज यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत बसवराज यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. बसवराज यांची हत्या करुन आरोपी पंकज घटनास्थळावरून पसार झाला.

आरोपी पंकज हा चिपळूणच्या दिशेने गेला असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांना मिळातच सहाय्यक पोलिस निरिक्षक हरीदास बोचरे यांच्या पथकाने चिपळूनच्या दिशेने आरोपींचा माग काढला. मात्र आरोपी हा चिपळूणला गेला नसून तो पेणला गेला असल्याचे कळताच पोलिसांनी त्याच्या शोधात पेणच्या दिशेने मोर्चा वळविला. पहाटे तीन वाजता पेण येथून आरोपी पंकजला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

२०१९ साली आरपीएफ जवान पंकज यादव आणि त्यांच्या साथीदारात भांडण झाले होते. या प्रकरणाची चौकशी आरपीएफ इन्स्पेक्टर बसवराज गर्ग यांच्याकडे होती. चौकशी अंती पंकज याची चार वर्षाकरीता पगारातील इन्क्रीमेंट आणि बेसिक कपात करण्याची शिक्षा देण्यात आली होती. या गोष्टीचा राग पंकजच्या मनात होता. याच कारणावरुन पंकजने बसवराज यांचा जीव घेतला. पंकजची इन्क्रीमेंट रोखण्यात गर्ग यांच्यासह अन्य अधिकारी हे देखील चौकशी टीममध्ये होते. त्यापैकी दोन अधिकाऱ्यांच्या हत्येचा इरादा पंकजच्या मनी होता. त्यासाठी तो पेणला फरार झाला होता.. त्या आधीच कोळसेवाडी पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे.

Web Title: RPF inspector Murder by jawan

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here