Home क्राईम तरुणींना कमी वेळात जास्त पैसे कमविण्याचे आमिष दाखवून सेक्स रॅकेट मध्ये ढकलले

तरुणींना कमी वेळात जास्त पैसे कमविण्याचे आमिष दाखवून सेक्स रॅकेट मध्ये ढकलले

Nagpur Crime News : आरोपी हा पैशाचे आमिष दाखवून दोन मुलींकडून देहव्यापार (Prostitution) करवून घेत असल्याचे उघडकीस, नागपुरातील धक्कादायक प्रकार.

Prostitution by two girls with the lure of money

 

 

नागपूर: एका दलालाने कमी वेळात जास्त पैसे कमविण्याचे आमिष दाखवून दोन तरुणींना जाळ्यात ओढून दोघींनाही सेक्स रॅकेट’ (Sex racket)मध्ये ढकलल्याची घटना समोर आली आहे. याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली असता, त्यांनी छापा टाकून दोन मुलींची सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून त्याची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने दोन तरुणींना कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना देहविक्रीच्या व्यापारात ढकलले. याची माहिती पोलिसांना खबऱ्या मार्फत मिळाली. माहिती मिळताच, पोलिसांनी नरेंद्रनगरातील नवनाथ सोसायटीतील श्रध्दा इन हॉटेल अचानक छापा टाकला.

पोलिसांनी सुरूवातीला बनावट ग्राहकाद्वारे आरोपीसोबत संपर्क साधला. आरोपीने तरुणीचा एका रात्रीत १२ हजार रुपये असा सौदा केला. दरम्यान, बनावट ग्राहकाने हॉटेलवर जाताच, पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांकडून दोन तरुणींची सुटका करण्यात आली. आरोपी हा पैशाचे आमिष दाखवून दोन मुलींकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी आरोपीविरूध्द बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Prostitution by two girls with the lure of money

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here