Home अकोले अकोले: किराणा दुकानाला भीषण आग, लाखोंचे नुकसान

अकोले: किराणा दुकानाला भीषण आग, लाखोंचे नुकसान

Akole Shop Fire: शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याने दुकानातील किराणा मालासह, फ्रिज, टिव्ही फर्निचर आदी आगीत जळून खाक झाल्याची घटना.

Massive fire to the grocery store, loss of lakhs

अकोले:  शेंडी -भंडारदरा येथील किरण मुर्तडक यांच्या समर्थ किराणा स्टोअर्स या दुकानाला पहाटे 4 वाजेच्या दरम्यान शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याने दुकानातील किराणा मालासह, फ्रिज, टिव्ही फर्निचर आदी आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीत अंदाजे 20 ते 25 लाखांचे नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  दि. 9 गुरुवार पहाटे 4 वाजेच्या दरम्यान दुकानातील फ्रिज जवळ वायरिंग चे शॉर्टसर्किट होवुन आग लागली. त्यावेळी दुकानात किरण मुर्तडक यांचा मुलगा सक्षम हा झोपलेला होता. दुकानात संपुर्ण धुर झाल्याने त्याला जाग आली. परंतु त्याला धुरामुळे काही दिसत नव्हते तरी कसा बसा जिना चढुन वरती घरात गेला व आपल्या वडिलांना उठविले. वडिलांच्या लक्षात आले की दुकानात आग लागली आहे.

त्यांनी तात्काळ आजुबाजूला मित्र परिवाराला फोन करुन मदतीला बोलविले. सदर घटना समजताच गावातील तरुणांनी मदतीसाठी धावून घेतली. आग मोठ्या प्रमाणात लागल्याने त्यावर नियंत्रण मिळविणे सहज शक्य नसताना देखील तरुणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन दोन तासांनी आग विझविण्याचा मात्र तो पर्यंत दुकानाची राखरांगोळी झाली होती.

Web Title: Massive fire to the grocery store, loss of lakhs

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here