Ahmednagar News: तरुणाचा मृतदेह गोदावरी नदीच्या पुलाजवळ आढळून आला.
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव शिवारात सोमनाथ बाळासाहेब जाधव (वय २६, रा. कान्हेगाव, ता. कोपरगाव) या तरुणाचा मृतदेह रविवारी रात्री गोदावरी नदीच्या पुलाजवळ आढळून आला.
कोपरगावातील कान्हेगाव येथील रहिवासी असलेला तरुण सोमनाथ जाधव हा रविवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास मृत अवस्थेत आढळून आला. त्याची ओळख पटल्यावर त्यास कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते. तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यास मयत घोषित केले आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल एस. एन. शेख यांनी भेट दिली. दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: Dead body of the youth was found near the Godavari river bridge
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App