हेरंब कुलकर्णी हल्लाप्रकरणी तिघांना अटक, धक्कादायक कारण, दोघे पसार
Ahmednagar News: सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला, तिघांना अटक (Arrested).
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली होती. यामध्ये कुलकर्णी यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. घटनास्थळाचा एक व्हिडिओही समोर आला होता. ज्यामध्ये काही जण गाडीवरुन आले आणि त्यांच्यावर हल्ला केल्याचं दिसतं. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. त्यातील एक अल्पवयीन असल्याची माहिती आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला यातील आणखी दोन आरोपी फरार आहेत.
शनिवारी दुपारी कुलकर्णी यांना रस्त्यात अडवून लोखंडी गजाने मारहाण कण्यात आली होती. संघटनांनी आवाज उठविल्यावर सोमवारी तपासाने वेग घेतला. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे प्रथम चैतन्य सुनिल सुडके (रा. सुडकेमळा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अक्षय विष्णू सब्बन आणि एक विधीसंघर्ष बालक यांना अटक केली. त्यांचे साथिदार अक्षय (पूर्ण नाव माहिती नाही) आणि सनी जगदाने हे दोघे फरार आहेत. यातील अक्षय सब्बन याची सीताराम सारडा विद्यालयाजवळ पानटपरी होती. हेरंब रामचंद्र कुलकर्णी महापालिकेत अर्ज केल्याने ती हटविण्यात आली. या रागातून आरोपींनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय विष्णु सब्बन याची सिताराम सारडा विद्यालयाजवळ पानटपरी होती. पानटपरी ती अतिक्रमणामध्ये येत असल्याने मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांनी पानटपरी काढण्यासाठी महानगरपालिकेत अर्ज दिला त्यामुळे ती पानटपरी काढण्यात आलेली होती. त्याचा राग मनात धरुन अक्षय विष्णु सब्बन याचे सांगणेवरुन चैतन्य सुनिल सुडके रा. सुडकेमळा, अहमदनगर, अक्षय (पुर्ण नांव माहित नाही) सनि जगधने, व एक विधीसंघर्षीत बालक अशांनी मिळुन केला. पोलिसांनी यातील अक्षय विष्णु सब्बन दातरंगे मळा, विटभट्टीजवळ, ता. जि. अहमदनगर, चैतन्य सुनिल सुडके सुडकेमळा, अहमदनगर आणि एक विधीसंघर्षीत बालक यांना अटक केली. तर दोघे फरार आहेत.
Web Title: Three arrested in Heramb Kulkarni attack case, shocking reason
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App