Breaking News | Jalgaon Accident: मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यु झाला.
जळगाव : जळगाव- भुसावळ महामार्गावरील रस्त्यावर मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यु झाला आहे. वाढदिवसाच्या दिवशीच या तरुणाचा मृत्यूने गाठले आहे. तर त्यांचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना घडली तालुक्यातील कोरपावली परिसरात घडली आहे.
तालुक्यातील कोरपवली येथील राहुल संतोष सोनवणे (वय २१) व दिपक उर्फ देवेन्द्र दत्तु तायडे (वय २३) हे दोन्ही मित्र ११ नोव्हेंबरला रात्री १० ते १२ वाजेच्या दरम्यान मोटरसायकलने दुचाकीवरून भुसावळकडून जळगावकडे जात होते. यावेळी महामार्गावरील गोदावरी हॉस्पीटलजवळ असलेल्या एका ढाब्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक बसताच दुचाकीवरील दोघेजण दिल्याने रस्त्यावर फेकले गेले. यात दोघेजण गंभीर जखमी झाले होते.
दरम्यान या भीषण अपघातात राहुल सोनवणे याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेला दीपक हा गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेचे वृत्त कळताच कोरपावली गाव व परिसरात सर्वत्र एकच शोककळा पसरली आहे. संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
Web Title: Death came on his birthday
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study