Home अहमदनगर बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचे मोठं वक्तव्य

बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचे मोठं वक्तव्य

Breaking News | Sharad Pawar | Assembly Election: शरद पवार यांनी आ. बाळासाहेब थोरात यांचे कौतुक केले.

Powers of the state should be given in the hands of Balasaheb Thorat Sharad Pawar

राहाता (जि. अहिल्यानगर): बाळासाहेब थोरातांना निर्णयाचे आता अधिकार द्यायला हवेत. त्यांच्या हातात राज्य दिले तर अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडी सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण? यावरून बरीच चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर शिर्डी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पवार यांनी थोरात यांचे कौतुक केले. व्यासपीठावर थोरातही उपस्थित होते.

पवार म्हणाले, शेतीचे प्रश्न सोडवायचे असतील तर थोरातांना तुम्ही आता निर्णयाचे अधिकार द्यायला हवेत. मी काही विधानसभेत जाणार नाही. थोरात तेथे आहेत. राज्याचा कृषिमंत्री म्हणून देशातील इतर कृषिमंत्र्यांच्या तुलनेत त्यांनी सर्वोत्तम काम केले. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव तालुक्यातही शरद पवार यांच्या सभा झाल्या. ज्यांनी साथ सोडली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Powers of the state should be given in the hands of Balasaheb Thorat Sharad Pawar

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here