Home Accident News Valentine Day च्या दिवशी पतीला आणण्यासाठी गेलेल्या तरुण विवाहितेचा मृत्यू

Valentine Day च्या दिवशी पतीला आणण्यासाठी गेलेल्या तरुण विवाहितेचा मृत्यू

death of a young married woman who went to fetch her husband on Valentine Day

मावळ | Pune: Valentine  Day च्या दिवशी  अपघातात दुर्दैवी घटना घडली आहे. मावळमधील तळेगाव चाकण रस्त्यावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक बसल्याने (Accident) एका 25 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मसिरा अझरुद्दीन मोमीन असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

मसिरा मोमीन या दुचाकीवरून आपल्या पतीला उर्से टोल नाक्यावर आणण्यासाठी जात असताना तळेगाव चाकण रस्त्यावर त्यांना उसाच्या ट्रॉलीने धडक दिली. त्यात मसिरा या रस्त्यावर पडल्यामुळे डोक्याला गंभीर जखमी  झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मसीरा या जखमी अवस्थेत सुमारे अर्धा तास रस्त्यावर पडून होत्या. मुंबईवरून येणाऱ्या आपल्या पतीला आणण्यासाठी जात असताना महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी . घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चालकाला अटक करण्यात आली आहे.

Web Title: death of a young married woman who went to fetch her husband on Valentine Day

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here