Home अहमदनगर अहमदनगर: गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास अटक

अहमदनगर: गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास अटक

Nevasa Crime Young man arrested

अहमदनगर| Ahmedagar Crime| नेवासा: गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. शरीफ उर्फ गोट्या अकबर पठाण (वय 30 रा. नेवासा बस स्थानकाच्या पाठीमागे, ता. नेवासा) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्याकडून 30 हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा, 600 रूपये किंमतीचे दोन जिवंत काडतुसे असा 30 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस नाईक संदीप संजय दरंदले यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आरोपी पठाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत. गावठी कट्टे बाळगणार्‍यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोहिम सुरू केली आहे. शेंडी (ता. नगर) गावातील बाह्यवळण रस्त्यावर एक मध्यम बांध्याच मुलगा लाल शर्ट घालून गावठी कट्टा व काडतुसे जवळ बाळगून फिरत आहे अशी पोलीस निरीक्षक कटके यांना गोपनिय माहिती मिळाली.

त्यानुसार कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने अहमदनगर-औरंगाबाद रोडवरील शेंडी येथे सापळा लावून थांबले असतांना, मिळालेल्या माहितीप्रमाणे शेंडी बाह्यवळण रस्ता ते डेअरी चौक एमआयडीसीकडे जाणारे रस्त्याने एक व्यक्ती पायी जात असतांना दिसला. पथकाला तोच व्यक्ती हाच असल्याची खात्री होताच, पथकाने त्याला घेराव घालून ताब्यात घेतले. त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यात गावठी कट्टा व काडतुसे मिळून आली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, हवालदार दत्तात्रय गव्हाणे, संदीप दरंदले, संतोष लोढे, ज्ञानेश्‍वर शिंदे, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, संभाजी कोतकर केली आहे.

Web Title: Nevasa Crime Young man arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here