अहमदनगर: चोरट्यांनी व्यावसायिकाच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकली अन ..
अहमदनगर | Ahmednagar: डोळ्यांत मिरचीची पूड टाकून लूटण्याचा प्रयत्न झालाय. व्यावसायिक आपल्या दैनंदिन कामावरून घरी परतत असताना एका व्यावसायिकासोबत डोळ्यांत मिरचीची पूड टाकून लूटण्याचा प्रयत्न झाला. घराजवळ पोहोचलेला हा व्यावसायिक घरासमोर कार पार्किंग करत असतानाच कारमधून आलेल्या काही व्यक्तींनी या व्यावसायिकाच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकली. तसेच हत्याराचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न केला. संदीप नागरगोजे असे व्यापाऱ्याचे नाव आहे. अहमदनगरच्या नागापूर परिसरातील आदर्श नगरमधील गुरुकृपा कॉलनीत ही घटना घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
संदीप नागरगोजे यांनी आपल्या घरासमोर गाडी पार्क करताच पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी त्यांच्याशेजारी आपली कार उभी केली. त्यातील एक चोर खाली उतरला आणि त्याने नागरगोजे यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. पण नागरगोजे यांनी प्रसंगावधान राखत पैशांची बॅग घराच्या गेटच्या आतमध्ये फेकली आणि चोरट्यांचा चोरट्यांचा प्रतिकार केल्याने चोरट्यांनी पळ काढला.
याप्रकरणी संदीप नागरगोजे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात यांनी फिर्याद दिली आहे. ज्या परिसरात हा प्रकार घडला त्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेयाप्रकरणी आता पोलिसांत तक्रार देण्यात आली असून पुढील कारवाई होत आहे.
Web Title: Ahmednagar thieves put pepper powder in the businessman’s eyes