Home अहमदनगर अहमदनगर: कार गाडी खोल खड्ड्यात पलटी झाल्याने अपघात

अहमदनगर: कार गाडी खोल खड्ड्यात पलटी झाल्याने अपघात

amkhed Accident car overturned into a deep pit

जामखेड | अहमदनगर | Jamkhed: तुळजापुर येथे दर्शन घेऊन भाविक जामखेड कडे जाणार्‍या भरधाव स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम. एच.13 टीसी 246 ) कार गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी खोल खड्ड्यात पलटी झाल्याने अपघात घडला. ही घटना सकाळी 8 वाजता घडली. या अपघातात पाच भाविक जखमी झाले असून यामधील एका जणाची स्थिती गंभीर आहे.

या अपघातात जामखेड येथील अभिषेक अंधारे (22), गौरव जाधव (24), अक्षय पवार (23), अक्षय जाधव (23) अशी जखमींची नावे आहेत. त्यातील एकजण गंभीर जखमी झालेला असून त्याचे नाव समजू शकले नाही. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघातस्थळी महाजनवाडी येथील शिवाजी घरत, लिंबागणेश येथिल विक्की वाणी व त्यांच्या सहकार्‍यांनी जखमीला गाडीच्या बाहेर काढण्यास मदत केली. घटनास्थळी मांजरसुंभा येथील राष्ट्रीय महामार्ग पोलीस केंद्रातील कर्मचारी ठोंबरे, मेहत्रे, राठोड पोलीस नाईक थोरात, उबे कॉन्स्टेबल पोहचले. जखमींना रुग्णवाहीकेद्वारे बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

Web Title: Jamkhed Accident car overturned into a deep pit

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here