Home नाशिक खळबळजनक: उप विभागीय अधिकारी (प्रांत) ४० लाखांच्या लाच प्रकरणात जाळयात

खळबळजनक: उप विभागीय अधिकारी (प्रांत) ४० लाखांच्या लाच प्रकरणात जाळयात

Dindori: दिंडोरी उपविभागीय अधिकारी (प्रांत) हा तब्बल ४० लाखांच्या लाच (Bribe) प्रकरणात एसीबीच्या हाती.

Deputy Divisional Officer Province arrested in Rs 40 lakh bribe case

दिंडोरी: नाशिक जिल्ह्यात एसीबी च्या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. दिंडोरी उपविभागीय अधिकारी (प्रांत) निलेश अपार हा तब्बल ४० लाखांच्या लाच प्रकरणात एसीबीच्या हाती लागल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक लाचखोरांवर एसीबीने कारवाई केली असून आता आणखी एक मोठा मासा एसीबीच्या गळाला लागला आहे.

एका खासगी कंपनीची जागा अकृषक (एनए) करुन देण्यासाठी निलेश अपारने तब्बल ४० लाख रुपयांची लाच मागितली होते. याबाबत एसीबीला माहिती मिळताच एसीबीने सापळा रचून अपार याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले असून सध्या अपारची एसीबीच्या पथकाकडून सुरु आहे.

दरम्यान, 23 नोव्हेंबर 2023 रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी शर्मिष्ठा वालावलकर यांनी स्वीकारल्यापासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी व लाचखोर यांच्याविरुध्द धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत नाशिक विभागात सुमारे 90 गुन्हे दाखल करून तब्बल सुमारे 130 आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे.

Web Title: Deputy Divisional Officer Province arrested in Rs 40 lakh bribe case

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here