Home अहमदनगर विखे-थोरात यांच्यामध्येच जुंपले पुन्हा वाकयुध्द

विखे-थोरात यांच्यामध्येच जुंपले पुन्हा वाकयुध्द

साईंच्या दर्शनबारी उद्घाटनावरून विखे- थोरातांमध्ये जुंपली, दशर्न बारीच्या उद्घाटनावरून विखे-थोरात यांच्यामध्येच वाकयुध्द (Battle).

Vikhe and Thorat, there was another battle

शिर्डी: शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयी- सुविधा देण्यात साई संस्थान नेहमी आग्रही असते. असे असताना या सुविधेचा भाग म्हणून सुमारे १८० कोटी खर्च करून तयार केलेली अद्ययावत दर्शनबारी केवळ उद्घाटना अभावी गेल्या काही दिवसांपासून पडुन आहे. या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेत, अशी आग्रही भूमिका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आहे तर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू साई दर्शनासाठी येत असल्याने त्यांच्या हस्ते दर्शनबारीचे उद्घाटन करावे अशी मागणी आहे. त्यामुळे दशर्न बारीच्या उद्घाटनावरून विखे-थोरात यांच्यामध्येच वाकयुध्द रंगले आहे.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल राजकीय विधाने करणे टाळली पाहिजेत. ते उद्घाटनाला येणार असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यांना निमंत्रण दिले असून त्यांनी स्वीकारले आहे. एवढं मोठं नेतृत्व आपल्याला आहे. स्वाभाविकपणे त्यांच्या तारखा मिळणं त्यांचा वेळ मिळणं. त्यांनी लवकर यावं अशी आपली अपेक्षा आहे. त्याना विश्वनेता म्हणून गौरविण्यात आले याचा आपल्याला अभिमान आहे. ज्या पद्धतीने अमेरिकेत क्वचितच एखाद्या पंतप्रधान यांना सन्मान मिळतो. पहिल्यांदा आपल्या पंतप्रधान यांना मिळाला आहे. यामुळे अभिमानाने आपली छाती फुगून येते. त्यांच्या नेतृत्वात काशी विश्वनाथाच कॉरिडॉर विकसित झाले हे लोकांना स्वप्नात देखील वाटत नव्हते. राम मंदिराचा प्रश्न देखील निकाली लागला. एक कर्तव्यदक्ष नेता म्हणून माणसाच्या मनामनामध्ये मान्यता आहे. निश्चितपणे दर्शनबारीचे लवकर उद्घाटन व्हावं ही लोकांची भावना आहे. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. आपण जेव्हा एखादा प्रकल्प करतो, त्या प्रकल्पाच्या पाठीमागच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे. राष्ट्रपती ह्या देशातील सर्वोच्च व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत अशी काही विधाने करणे सोडून दिले पाहिजे, शेवटी ते राजकीय ज्येष्ठ नेते आहे. सत्ता गेल्याची अस्वस्थता प्रचंड आहे. त्यामुळे ते अशी विधान करत असतात. त्यांना एवढं गांभीर्याने घेण्याचे काही कारण नाही. काही पक्षाचे नेते मुख्यमंत्री ठरू लागले आहेत. त्यासाठी संख्याबळ लागते. काही लोक स्वप्न रंजन करायला आवडत असते असे ना. विखे पाटील म्हणाले.

तर प्रसार माध्यमांशी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, योगायोगाने देशाच्या महामहिम राष्ट्रपती साई दर्शनासाठी येत आहेत, त्यांच्या हस्ते उद्घाटन केले तर भाविकांसाठी दर्शनबारी खुली होईल. त्यामुळे त्यांच्या हस्ते उद्घाटन करावे, असा माझा आग्रह आहे. पंतप्रधान उद्घाटनाला येणार असून आता सहा महिने वाट पाहिली आता किती दिवस वाट पहायची. पंतप्रधान यांच्या हस्ते होणार असेल त्यावर कोणाचाही आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. मात्र केवळ पंतप्रधान येणार आणि त्यांच्याच हस्ते उद्घाटन करायचं म्हणून ते आतापर्यंत लांबविण्यात आलं. एवढं मोठं काम झालेले असतांना त्या कामाचा लाभ भाविकांना मिळत नाही. हे सुध्दा योग्य नाही. पाट तर कधीही थोपटून घ्या, इथं येऊन थोपटून घ्या, तिथं जाऊन थोपटून घ्या. आमचं काहीही म्हणणं नाही. मात्र भाविकांची दर्शनबारीत उभं राहून शांततेनं दर्शन घ्यावं ही संधी का घालवतात. हे कळत नाही. ते काम पूर्ण झालेल असताना देखील दर्शनाला उभं राहणं शक्य होतं. परंतु पंतप्रधान येणार आणि उद्घाटन होणार यात ते लांबविण्यात आलं. यंदा प्रचंड कडक उन्हाळा होता. यामध्ये भाविकांना ती सुविधा मिळाली नाही. आता आम्ही किती दिवस वाट पाहणार. देशाच्या महामहिम येणार असतील तर तीही आनंदाची पर्वणी आहे, असे मत माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. त्यामुळे साईबाबांची दर्शनबारी ही राजकीय आरोप- प्रत्यारोपात अडकली आहे.

Web Title: Vikhe and Thorat, there was another battle

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here