Home अहमदनगर ब्रेकिंग न्यूज! दादा झाला का, तरुणाच्या डोक्यात मारला रॉड

ब्रेकिंग न्यूज! दादा झाला का, तरुणाच्या डोक्यात मारला रॉड

Breaking News | Ahmednagar Crime: एका तरूणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी.

Did the grandfather hit the young man's head with a rod crime filed

श्रीरामपूरः  ‘तुला जास्त माज आला का?, तू मार्केटयार्डचा दादा झाला का?’, असे म्हणत श्रीरामपुरात एका तरूणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले. श्रीरामपूरातील वार्ड ७ मध्ये गुरूवारी ही घटना घडली. श्रीरामपूर शहर पोलिस कामात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण राजू शिंदे असे जखमी तरूणाचे नाव आहे. गणेश खंडागळे, दिपक खंडागळे, विजय खंडागळे व त्यांचा एक अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शिंदे हा भळगट चौकात शंकर बनसोडे यांच्या फळाच्या दुकानासमोर उभा असताना गणेश खंडागळे, दिपक खंडागळे, विजय खंडागळे व त्यांचा एक अनोळखी मित्र असे चौघे तेथे आले. ‘तू मार्केट यार्डचा दादा झाला का? असे म्हणत गणेश खंडागळे याने किरणच्या डोक्यात लोखंडी गज मारला. ‘आमच्या नादाला लागला तर जिवे ठार मारू, अशी धमकी देत आरोपी निघून गेले. उपस्थितांनी शिंदे यास रूग्णालयात दाखल केले. शिंदेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Did the grandfather hit the young man’s head with a rod crime filed

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here