Home क्राईम धक्कादायक! गुटख्याच्या पुडीसाठी तरुणाने मित्राची चाकूने भोसकून केली हत्या

धक्कादायक! गुटख्याच्या पुडीसाठी तरुणाने मित्राची चाकूने भोसकून केली हत्या

Breaking crime News : गुटख्याच्या पुडीसाठी झालेल्या वादातून मित्राने एकाचा चाकूने भोसकून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना.

young man stabbed his friend to death for gutkha powder

जालना: जालना जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे.  गुटख्याच्या पुडीसाठी झालेल्या वादातून एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. मित्रानेच  त्याचा चाकूने भोसकून खून केला. जालना शहराच्या जवळच असलेल्या पीर पिंपळगाव शिवारात ही घटना घडली.

दिलिप हरिभाऊ कोल्हे (वय २३ वर्ष) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर अरविंद लक्ष्मण शेळके असं आरोपीचं नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुटख्याची पुडीवरून दोघांमध्ये वादावादी झाली. वाद इतका वाढला की, त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर अरविंदने दिलीपच्या छातीत चाकू खुपसला. दिलीप रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपीने साथीदारांसह पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दिलीपचा जागीच मृत्यू झाला होता.  मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात  पाठवला गेला. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Murder young man stabbed his friend to death for gutkha powder

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here