धक्कादायक! आठवीतील विद्यार्थ्याला रिंगण करून बेल्टने बेदम मारहाण, वसतीगृहातील घटना
Breaking News | Ahilyanagar crime: निवासी वसतिगृहातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. वस्तीगृहातील नववीच्या मुलांनी आठवीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल.
जामखेड : अहिल्यानगरच्या जामखेड येथील निवासी वसतिगृहातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. वस्तीगृहातील नववीच्या मुलांनी आठवीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
जामखेडच्या अनुसूचित जाती जमाती, नवबौद्ध मुलांच्या निवासी विद्यालयातील हा प्रकार घडला आहे. या व्हिडीओमध्ये एका लहान मुलाला रिंगण करून बेल्टने मारहाण करण्यात आली. या घटनेने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील आरोळे वस्ती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी वसतीगृहात इयत्ता आठवीच्या मुलांना नववीच्या मुलांना मारहाण झाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दि. २१ रोजची घटना आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अहिल्यानगर प्रविण कोरगंट्टीवार आले असून पोलीस निरीक्षक महेश पाटील व मारहाण झालेल्या व मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आईवडिल यांची संयुक्त बैठक सुरू आहे. कोरगंट्टीवार यांनी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली असून ते चौकशी करून संध्याकाळ पर्यंत अहवाल देणार आहेत.
मुले अल्पवयीन असल्याने सदर प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न कालच झाला होता. परंतु व्हिडीओ व्हायरल झाला त्यामुळे प्रशासन दखल घ्यावी लागली. मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांना काढून टाका व कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी याबाबत सहायक आयुक्त कोगट्टीवार म्हणाले संध्याकाळ पर्यंत अहवाल येईल त्यानंतर कारवाई बाबत माहिती मिळेल.
Breaking News: Eighth grade student beaten up in a ring with a belt