संगमनेर ग्रामपंचायत निवडणूक: देशी विदेशी दारू, उमेदवाराच्या पतीला 8 लाख 570 रुपयांच्या मुद्देमालासह रंगेहाथ पकडले
संगमनेर ग्रामपंचायत निवडणूक: साकुर येथे देशी विदेशी दारू घेऊन फिरताना महिला उमेदवाराच्या पतीला 8 लाख 570 रुपयांच्या मुद्देमालासह रंगेहाथ पकडले, दोघांवर विविध कलमान्वये घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल .
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठारभागावरील साकुर येथे देशी विदेशी दारू घेऊन फिरताना महिला उमेदवाराच्या पतीला 8 लाख 570 रुपयांच्या मुद्देमालासह रंगेहात पकडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवार दि.18 डिसेंबर 2022 रोजी रात्री 1 वाजता घडली. यात विदेशी रॉयल चॅलेंज बॉटल, विदेशी रॉयल स्टॅग,संत्रा देशी दारू , टाटा मोटर्सची लाल रंगाची चारचाकी गाडी आशा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.
यामध्ये आरोपी शांताराम पोपट गाडेकर (रा. साकुर,ता.संगमनेर), ऋषीकेश संजय गाडेकर या दोघांवर विविध कलमान्वये घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या दोघांना रात्री उशिरा घारगाव पोलीस ठाण्यात समज देऊन सोडण्यात आले आहे. खरंतर, सुसंस्कृत संगमनेर मध्ये निवडणुकीच्या रात्री अशी अवैध दारू देऊन आमिष दाखवून मतदान मिळवत असेल तर हे दुर्दैव आहे. आरोपीची पत्नी साकुर येथे उमेदवारी करत आहेत आणि पती दारू वाटत फिरत आहे हा किती मोठा लोकशाहीचा घात आहे. त्यामुळे, अशा लोकांना वेळीच धडा शिकवावा अशी मागणी साकुर येथील सुज्ञ नागरिक करत आहे.
Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लागली आहे. यामध्ये तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींची निवडणूक असल्याने पोलिसांनी आपला बंदोबस्त वाढवला आहे. जिथे दोन गटात तणावाचे वातावरण आहे तिथे पोलिसांनी रात्रीचा गस्त घातला आहे. त्यामुळे, साकुर येथे लाल रंगांची चारचाकी गाडी एम. एच. 17.सी. एम.9295 यामध्ये दारू असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना गोपनीय मिळाली. त्यांनी तात्काळ जागेवाडी साकुर येथे जाऊन या लाल रंगाची गाडी रस्त्यावर हटकवली. गाडीची धडती घेत असताना गाडीच्या पाठीमागील डिकीमध्ये अवैध प्रकारची दारु आढळुन आली. यात विदेशी रॉयल चॅलेंज बॉटल, विदेशी रॉयल स्टेग, संत्रा देशी दारू असल्याने पोलिसांनी आरोपी शांताराम गाडेकर व ऋषिकेश गाडेकर या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची कार, दारूचे बॉक्स असा 8 लाख 570 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याचा पुढील तपास पो. कॉ.डी.एस.वायाळ करत आहे.
Web Title: Election candidate’s husband caught red-handed with Rs 8 lakh 570 liquor
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App