Home औरंगाबाद टेम्पो ट्रॅव्हल्सने उडवले, पोलिसाचा मृत्यू, मुलीचा वाढदिवस साजरा….

टेम्पो ट्रॅव्हल्सने उडवले, पोलिसाचा मृत्यू, मुलीचा वाढदिवस साजरा….

Breaking News | फाट्याजवळ पेट्रोल भरण्यासाठी वळण घेताना सुसाट ट्रॅव्हल्स चालकाने त्यांना धडक.

Tempo Travels, Cop's Death, Girl's Birthday Celebration

छत्रपती संभाजीनगर: मित्राला भेटून शहरात परतत असताना अंमलदार अविनाश नारायण जोशी (४४, रा. आविष्कार कॉलनी, एन-६) यांचा टेम्पो ट्रॅव्हल्सच्या धडकेत मृत्यू झाला. कचनेर फाट्याजवळ पेट्रोल भरण्यासाठी वळण घेताना सुसाट ट्रॅव्हल्स चालकाने त्यांना धडक दिली. रविवारी पहाटे ३.३० वाजता हा अपघात घडला.

जोशी शनिवारी सायंकाळी मित्राला भेटण्यास गेले होते. तेथून मध्यरात्री दुचाकीवरून एकटे शहराकडे परतत होते. कचनेर फाट्याजवळ पेट्रोल भरण्यासाठी त्यांनी उजव्या बाजूला वळण घेतले.

मात्र, बीडच्या दिशेने सुसाट जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सखाली ते सापडले. वेग खूप असल्याने जोशी लांब फेकले जाऊन ट्रॅव्हल्सचा समोरील संपूर्ण भाग चेपला गेला.

मुलीचा वाढदिवस साजरा करून गेले

शनिवारी जोशी यांची साप्ताहिक सुटी असल्याने त्यांनी दिवसभर कुटुंबासोबत वेळ घालवला. आईवडील, पत्नी, १५ वर्षाचा मुलगा, १३ वर्षाची मुलगी व एक लहान भाऊ असे त्यांचे कुटुंब आहे. शनिवारी त्यांनी लाडक्या मुलीचा वाढदिवस आनंदात साजरा केला. तिथीप्रमाणेदेखील पुन्हा वाढदिवस साजरा करू, असे वचन त्यांनी मुलीला दिले. उशीर झाल्याने २.३० वाजता त्यांच्या वडिलांनी त्यांना फोन केला. तेव्हा अर्ध्या तासात घरी पोहोचतो, असे जोशी वडिलांना म्हणाले. मात्र, काही वेळातच ही घटना घडली. करमाड पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Tempo Travels, Cop’s Death, Girl’s Birthday Celebration…

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here