Home पुणे ‘तु मला भेटण्यासाठी नाही आली तर मी मरेन, बोलावून कारमध्येच बलात्कार

‘तु मला भेटण्यासाठी नाही आली तर मी मरेन, बोलावून कारमध्येच बलात्कार

Breaking News | Pune Crime: तरुणीला भेटण्यासाठी बोलवून घेत तिच्यावर कारमध्ये बलात्कार केल्याची घटना.

If you don't come to meet me I will die, called and raped in the car

पुणेः ‘तु मला भेटण्यासाठी नाही आली तर मी आताच्या आता मरणार आहे’ असे म्हणत तरुणीला भेटण्यासाठी बोलवून घेत तिच्यावर कारमध्ये बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच तरुणीच्या घरी जाऊन तिच्या वडिलांना शिवीगाळ देखील केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

सदर  प्रकार जून २०२१ ते सप्टेंबर २०२३ आणि गुरुवारी (दि. ८) रात्री अकराच्या सुमारास वाघोली येथे घडला आहे. याबाबत २३ वर्षीय तरुणीने शनिवारी (दि.१०) लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून गौरव पांडुरंग बोराटे (२७, रा. बोराटे वस्ती, खराडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादी यांना फोन करून भेटण्यासाठी बोलवले. भेटण्यासाठी आली नाही, तर मी आताच्या आता मरणार आहे, अशी धमकी देत भेटण्यासाठी भाग पाडले. तरुणी भेटण्यासाठी आली असता आरोपीने त्याच्या कारमध्ये तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने वारंवार तरुणीला भेटण्यासाठी बोलावून घेऊन अत्याचार केले. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक भदे या करीत आहेत.

Web Title: If you don’t come to meet me I will die, called and raped in the car

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here