Home महाराष्ट्र अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आणखी एका कॉंग्रेस नेत्याचा राजीनामा

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आणखी एका कॉंग्रेस नेत्याचा राजीनामा

Breaking News | Ashok Chavan Resign: विधानसभा अध्यक्ष राहुल नावेर्कर यांनी अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर केला.

Ashok Chavan Resign ang amar Rajurkar Resign

Ashok Chavan Resign: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या आमदारकीच्या राजीनाम्यानंतर आणखी एक काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते व माजी आमदार अमर राजूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजूरकर नांदेड जिल्ह्यातील असून ते चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. राजूरकर यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी प्रतोद, महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड शहर काँग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्याचप्रमाणे अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला आहे.  अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आमदारकी सोडली म्हणजे पक्षही सोडला. भाजपमध्ये प्रवेशाची दाट शक्यता आहे. आमदारकी अचानक सोडण्यामागे राज्यसभेची निवडणूक आहे. अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याचे समजते. पण त्यांची जागा चार खात्रीच्या जागांमधली आहे की महायुती लढवणारी पाचवी जागा आहे ते अजून निश्चित नाही.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया:

अशोक चव्हाण यांनी नुकतीच मुंबईत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, मी विधानसभा अध्यक्षांना भेटून काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर प्रदेशाध्यक्षांना काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये असताना नेहमीच प्रामाणिकपणे काम केलं. मला कोणाबद्दल कसलीही तक्रार करायची नाही, राजीनामा देण्यामागे कुठलीही व्यक्तीगत भावना नाही. माझी पुढची राजकीय दिशा काय असेल याबाबत निवेदन निश्चित करेन. एक ते दोन दिवसांत तुम्हाला सर्वकाही सांगेन. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नावेर्कर यांनी अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

Web Title: Ashok Chavan Resign ang amar Rajurkar Resign

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here