Home पुणे इंजीनियरिंग कॉलेजच्या तरुणीची पेटवून घेत आत्महत्या

इंजीनियरिंग कॉलेजच्या तरुणीची पेटवून घेत आत्महत्या

Breaking News | Pune Crime:  कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीला कंटाळून आणि रूममेटच्या त्रासाला कंटाळून तरुणीचे स्वत:ला पेटवून घेतले. (Suicide)

Engineering college girl committed suicide by setting herself on fire

पुणे : पुण्यात धक्कादायक बातमी समोर आली आहे. होस्टेलच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीला कंटाळून आणि रूममेटच्या त्रासाला कंटाळून तरुणीचे स्वत:ला पेटवून घेतले आहे. पुण्यातील नामांकित इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये ही घटना घडली आहे. यात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सात मार्चला ही घटना घडली असून या घटनेविरोधात भारती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  रेणुका बालाजी साळुंके (वय १९) असे पेटवून घेतलेल्या मुलीचं नाव आहे. ती भारती विद्यापीठ येथील इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. तिला होस्टेलच्या कॅन्टीन मधील कर्मचारी असलेला सतीश जाधव सतत आय लव्ह यूचा मेसेज करत होता. तू इतकी बिझी झालीस का? मी किती मेसेज केले, असे तो सारखा येता-जाता बोलत होता. हे सगळं पाहून रेणूकाच्या मनात भीती निर्माण झाली. त्यानंतर तिने हा प्रकार कोणाला सांगायचा प्रयत्न केला मात्र तिला ते जमलं नाही. त्यासोबतच हॉस्टेलमध्येच राहणारी मुस्कान महेंद्रसिंग सिद्धू (वय १९ ) ही देखील तिला त्रास देत होती. रेणूकाला अभ्यासात त्रास देत होती.

हा सगळा प्रकार रेणूकाच्या डोक्यात गेला आणि तिने थेट स्वत: ला संपवण्याचा प्रयत्न केला. ती बाथरुमध्ये गेली आणि तिने थेट स्वत:ला पेटवून घेतलं. तिला तातडीने पुण्यातील सुर्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी सतीश जाधव आणि तिची रुममेट असलेली मुस्कानवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Engineering college girl committed suicide by setting herself on fire

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here