Home संगमनेर संगमनेर: माजी नगरसेवकाची कार अडवली, चालकाला लुटले

संगमनेर: माजी नगरसेवकाची कार अडवली, चालकाला लुटले

Sangamner robbed: सातशे ते आठशे रुपये, पाऊण तोळ्याची सोन्याची अंगठी, मोबाईल असा मुद्देमाल.

Ex-Corporator's car stopped, driver robbed

संगमनेर: संगमनेर नगर परिषदेचे माजी नगरसेवक किशोर टोकसे यांची कार चोरट्यांनी अडवत कारचालकाला लुटले. सातशे ते आठशे रुपये, पाऊण तोळ्याची सोन्याची अंगठी, मोबाईल असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला.

गुरुवारी (दि. २८) पहाटेच्या सुमारास कोल्हार-घोटी राज्यमार्गावर तालुक्यातील समनापूर शिवारात ही घटना घडली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चालकाने तक्रार अर्ज दिला आहे.

संगमनेर शहरातील व्यापारी नितीन लाहोटी हे काही कामानिमित्त त्यांचे मित्र आणि संगमनेर नगर परिषदेचे माजी नगरसेवक किशोर टोके यांची कार घेऊन मंगळवारी बाहेरगावी गेले होते. त्यांचे नेहमीचे कारचालक मनोज गीते (रा. कोंची, ता. संगमनेर) हे कार चालवत होते, ते गुरुवारी पहाटे संगमनेरात परतले असता लाहोटी यांनी कारचालक गीते यांना कार घेऊन घरी जाण्यास सांगितले. ते कॉची येथे जात असताना दुचाकीवरील तिघेजण मागे येत असल्याचे गीते यांनी पाहिले. काही अंतर पुढे गेल्यानंतर समनापूर बायपास चौफुलीवर येताच दुचाकी चालकाने गीते यांच्या कारला ओव्हरटेक केले. कारला दुचाकी आडवी लावत थांबविले. त्यांच्याकडे लाकडी दांडके, लोखंडी सळई असल्याचे गीते यांनी पाहिल्यानंतर ते घाबरले. गीते यांच्याकडील सातशे ते आठशे रुपये, पाऊण तोळ्याची सोन्याची अंगठी, मोबाईल असा मुद्देमाल त्यांनी चोरला. कारचा टायर पंक्चर करत चोरटे तेथून निघून गेले.

Web Title: Ex-Corporator’s car stopped, driver robbed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here