अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भपात करण्याचाही प्रयत्न
Ahmednagar News: लग्न करून तिच्यावर अत्याचार (abuse) करून गर्भवती, गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपात करण्याचा प्रयत्न.
अहमदनगर: अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून तिच्यावर अत्याचार करून गर्भवती केले. गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. नगर तालुक्यातील एका गावातील या पिडीतेवर पुणे येथे उपचार सुरु आहेत. तिने दिलेला जबाब राजगड पोलिसांनी एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केला आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती, सासू, सासरेविरूध्द गुन्हा दाखल केला होता. पीडित अल्पवयीन विवाहित मुलीने फिर्याद दिली होती. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पतीला १ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर सासू, सासऱ्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
नगर तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या तरूणाचे फिर्यादीसोबत लग्न झाले होते. लग्नासाठी झालेल्या खर्चाची मागणी करत पती, सासू-सासर्याने फिर्यादीचा छळ केला. मारहाण, दमदाटी केली.
फिर्यादी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्या पतीने शारिरीक संबंध ठेवून गर्भवती केले. तसेच गर्भधारणा झाल्यानंतर हे मुल माझे नाही म्हणून मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून गर्भपाताच्या गोळ्या बळजबरीने खायला देवून गर्भपात करण्याचा प्रयत्न केला होता.
Web Title: Abuse of a minor girl, attempted abortion