Home महाराष्ट्र बलात्काराचा खोटा गुन्हा, ‘सत्य समोर येईल’ म्हणत सीएने संपविले आयुष्य

बलात्काराचा खोटा गुन्हा, ‘सत्य समोर येईल’ म्हणत सीएने संपविले आयुष्य

Suicide News: इगतपुरीतील हॉटेलमध्ये घेतला गळफास, दोन पानी सुसाइड नोट ताब्यात.

False case of rape, CA ends his life

मुंबई : मुलुंडमधील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट चिराग विनोदराय वरैया (४५) यांनी इगतपुरी येथील हॉटेलमध्ये गळफास घेत आयुष्य संपविल्याची (Suicide) धक्कादायक घटना सोमवारी समोर आली.

काही दिवसांपूर्वी त्यांच्या बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्यांची चौकशी झाली. अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असतानाच त्यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. कुणाच्या दबावाखाली त्यांनी टोकाचे पाऊल उचलले? याबाबत तपास सुरू आहे.

याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी नोंद करत घटनास्थळावरून दोन पानी सुसाइड नोट ताब्यात घेतली आहे. सुसाइड नोटमध्ये ‘बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप करत सत्य लवकरच समोर येईल, असे नमूद केले आहे.

मुलुंडमध्ये चिराग यांची ‘चिराग वरैया आणि कंपनी आहे. १० जानेवारी रोजी त्यांच्या विरोधात भांडूप पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्ह्यात २६ जानेवारी रोजी ते भांडूप पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. मात्र, प्रकृती ठीक नसल्याने त्यांना दुसऱ्या दिवशी हजर राहण्यास सांगितले. त्यानंतर, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले. शनिवारी ते चालकासोबत त्यांनी इगतपुरी येथील मित्राच्या मानस प्रोजेक्ट हॉटेल विवांतमध्ये थांबले.

अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत इगतपुरीला राहणार असल्याचे कुटुंबीयांना सांगून त्यांनी चालकासोबत इगतपुरी गाठली. पोलिसांना लोकेशन समजू नये म्हणून त्यांचा मोबाइलही घरीच ठेवला होता.

काही दिवस डिस्टर्ब करू नको’

■ शनिवारी दुपारी हॉटेलवर पोहोचताच त्यांनी चालकाला दोन हजार रुपये देत पुढील काही दिवस डिस्टर्ब करू नको, असे सांगितले.

  • या ठिकाणाबाबतही कुणाला माहिती देऊ नको. तसेच सोमवारी मुंबईकडे निघायचे असल्याचे सांगितले. सोमवारी चालकाने चिराग यांना कॉल करण्यास सुरुवात केली.

■ दरवाजा ठोठावला. मात्र, प्रतिसाद आला नाही. त्यांना संशय आल्याने बनावट चावीने प्रयत्न सुरू केले.

■ अखेर पोलिसांशी संपर्क साधताच त्यांनी खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.

‘त्या’ महिलेविरोधात गुन्हा

■ मागील वर्षी जानेवारी महिन्यात चिराग वरैया यांच्यासह तीन जणांची फसवणूक केल्याप्रकरणी बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

■ यामध्ये चिराग यांची ९३ लाखांना फसवणूक झाली होती. या गुन्ह्यात महिलेला अटकही करण्यात आली होती.

याच गुन्ह्यानंतर महिलेने बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केल्याचे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे.

Web Title: False case of rape, CA ends his life

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here