Home अहमदनगर अहमदनगर: कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक ठार

अहमदनगर: कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक ठार

Ahmednagar Accident:  कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार.

One killed in an accident between a car and a bike

राशीन | Rashin: कर्जत तालुक्यातील आखोणी फाट्याजवळ मंगळवारी (दि. ३१) कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील राशीन भिगवण रस्त्यावर आखोणी फाट्याजवळ युनिव्हा आणि दुचाकी यांच्यात धडक झाल्याने यामध्ये दुचाकीस्वार बबन महिपती सूळ (वय ५३ रा. आखोणी) यांचा मृत्यू झाला. कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत कल्याण दत्तात्रय सूळ यांच्या खबरीवरून कर्जत पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी कल्याण दत्तात्रय सुळ यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बबन महिपती सुळ हे हिरो कंपनीची मोटारसायकल (एमएच 16, आरके 8197) वरून राशीनकडून आखोणीकडे जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या टोयोटा कंपनीची इनोव्हा कार (क्र. एमएच 31 एफयू 2524) या गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने गाडी चालवल्याने हा अपघात झाला.

या अपघातात मोटारसायकलचे नुकसान झाले असून बबन सुळ यांचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी गाडीचा चालक साईनाथ शंकर हळदेकर (रा. वाकर, ता. भोकर, जि. नांदेड) याच्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल काळे करत आहेत.

Web Title: One killed in an accident between a car and a bike

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here