Home क्राईम प्रसिद्ध बांधकाम व्यावयायिकाची रेल्वेखाली उडी मारत आत्महत्या, नेमकं कारण काय?

प्रसिद्ध बांधकाम व्यावयायिकाची रेल्वेखाली उडी मारत आत्महत्या, नेमकं कारण काय?

Nashik: नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावयायिकाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

A famous construction businessman committed suicide by jumping under a train.

नाशिक: नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावयायिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांचा भाऊ मनोहर कारडा यांनी रेल्वेखाली उडी मारत केली आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. मनोहर कारडा यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांचा भाऊ मनोहर कारडा यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी मनोहर यांचा भाऊ नरेश कारडा यांच्यावर फसवणुकीचा (fraud) गुन्हा करण्यात आला होता.

एक कोटी वीस लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी बिल्डर नरेश कारडा यांना अटक करण्यात आली होती. नाशिक शहरातील नामांकित बिल्डर म्हणून कारडा कन्स्ट्रक्शनची ओळख आहे. मनोहर कारडा यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील कारडा कन्स्ट्रक्शनचे बिल्डर नरेश कारडा यांना आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. बुकिंग रक्कम घेऊनही बांधकाम प्रकल्पाला सुरुवात न केल्याने गुंतवणूकदारांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई नाका पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: A famous construction businessman committed suicide by jumping under a train.

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here