Home अहमदनगर मोटार चालू करताना विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

मोटार चालू करताना विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

Ahmednagar | Rahata News:  शेतकऱ्याचा विजेचा शॉक (electric shock) लागून मृत्यू झाल्याची घटना.

Farmer dies due to electric shock while starting motor

राहता: मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना राहता तालुक्यातील वाखारवाडी लोहगाव येथे घडली.

भाऊसाहेब चांगदेव चेचरे ( वय ६० ) रा. लोहगाव या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार (दि.९) सकाळी शेतावर मोटार सुरू करण्यासाठी गेले असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. बराच वेळ होऊनही का येत नाहीत, हे पाहण्यासाठी त्यांचा घरचे घटनास्थळी गेले. तेव्हा त्यांचा मृतदेह मोटारीच्या खोक्याजवळ आढळुला आला. सदर  बातमी वाऱ्यासारखे गावात पसरली व सर्वत्र त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Farmer dies due to electric shock while starting motor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here