Home पुणे Weather Updates : राज्यात पुन्हा मुसळधार पाउस कोसळणार- हवामान खात्याचा इशारा

Weather Updates : राज्यात पुन्हा मुसळधार पाउस कोसळणार- हवामान खात्याचा इशारा

Weather Updates:  राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाउस (Rain) कोसळणार असल्याची शक्यता.

Weather updates Heavy rain will fall again in maharashtra 

पुणे: गणपतीचे आगमन होताच राज्यात पाऊस सक्रीय झाला. राज्यात बहुतेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहे. आता राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाउस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.  

बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुरूवारपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या पुणे येथील विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी काही वेळापूर्वी ट्विट केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती दिली. कोकण, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर, नाशिकसह पुणे विभागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

Web Title: Weather updates Heavy rain will fall again in maharashtra 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here