Home संगमनेर संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

Sangamner: निमगाव खुर्द परिसरात ६२ वर्षीय वृद्ध महिलेचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ.

Woman killed in Bibatya attack in Sangamner taluka news

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द परिसरात ६२ वर्षीय वृद्ध महिलेचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. सदर महिला आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास प्रातः विधीसाठी गेली असता सदरचा प्रकार घडल्याचे समजते.

शेळी बकऱ्याच्या लालसेने गेलेल्या बिबट्याने एका 62 वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला चढवीत महिलेच्या मानेला पकडून तिला फरपटत ५०० ते १००० फूट जंगलात ओढत नेल्याची घटना ६ सप्टेंबरला पहाटे पाचच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द परिसरात घडली आहे. मिराबाई रामभाऊ मेंगाळ वय 62 रा सावरचोर मेंगाळवाडी असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे.

मूळचे सावरचोर मेंगाळवाडी येथील रहिवासी असणाऱ्या मीराबाई रामभाऊ मेंगाळ ही महिला निमगाव खुर्द शिवारातील चंदन टेकडी परिसरात राहत होत्या. त्या शेळ्या पाळून आपला उदरनिर्वाह करत असे, वृद्ध महिला सोमवारी आपल्या छपरामध्ये अंगावर काळ्या रंगाची घोंगडी घेऊन झोपलेली होती. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास झोपेमध्ये असताना अचानक शेळीच्या शिकारीच्यालालसेने आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला अन त्या महिलेच्या मानेला पकडून पाचशे ते हजार फूट अंतरापर्यंत ओढत नेल्याने महिलेच्या गळ्याला व छातीला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Woman killed in Bibatya attack in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here