Home अहमदनगर Ahmednagar: ऐन गणपतीत अहमदनगर जिल्ह्यावर मोठं संकट

Ahmednagar: ऐन गणपतीत अहमदनगर जिल्ह्यावर मोठं संकट

Ahmednagar rain: पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा देखील समावेश.

Ganapati big crisis in Ahmednagar Rain

अहमदनगर: राज्यात मान्सून सक्रीय झाला असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा देखील समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होणार आहे. शुक्रवारी गणपतीचे विसर्जन होत आहे. या दरम्यान जोरदार पाउस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

येत्या 3 ते 4 दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 व्या दिवसापासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करुन दिली आहे.

नगरसह या जिल्ह्यांना इशारा (Ahmednagar Rain)

6 सप्टेंबर : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, नगर, जालना औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, वाशीम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा चंद्रपूर नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया

7 सप्टेंबर : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, नगर, जालना औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड

8 सप्टेंबर : पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली

9 सप्टेंबर : सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, नगर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया

Web Title: Ganapati big crisis in Ahmednagar Rain

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here