Home अहमदनगर अहमदनगर: रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ग्रा.पं. सदस्याचे अपहरण; सरपंचाविरोधात गुन्हा

अहमदनगर: रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ग्रा.पं. सदस्याचे अपहरण; सरपंचाविरोधात गुन्हा

Breaking News | Ahmednagar:  अविश्वास ठराव नामंजूर होण्याच्या हेतूने ग्रामपंचायत सदस्याचे रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण केल्याचा गुन्हा.

fear of the revolver, Gr.Pt. kidnapping of a member Crime against Sarpanch

अहमदनगर | आढळगाव : अविश्वास ठराव नामंजूर होण्याच्या हेतूने ग्रामपंचायत सदस्याचे रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण केल्याचा गुन्हा आढळगाव (ता. श्रीगोंदा) येथील सरपंच शिवप्रसाद उबाळे यांच्यासह अज्ञात सात व्यक्तींवर दाखल झाला आहे.

माहीजळगाव (ता. कर्जत) हद्दीतून मंगळवारी (दि.९) सायंकाळी सहाच्या सुमारास उबाळे आणि अन्य सात अज्ञात व्यक्तींनी ग्रामपंचायत सदस्य नितीन गव्हाणे याचे चारचाकी वाहनातून अपहरण केल्याची फिर्याद मिरजगाव (ता. कर्जत) पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत सदस्याच्या अपहरणाचा निषेध करण्यासाठी आढळगाव ग्रामस्थांनी गावातील व्यवहार बंद ठेवून श्रीगोंदा जामखेड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

दीपक राऊत यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अविश्वास ठराव दाखल केलेले दहा ग्रामपंचायत सदस्य अन्य सहकाऱ्यांसह वेगळ्या वाहनांमधून करमाळ्याहून आष्टीकडे जात होते. माहीजळगाव (ता. कर्जत) हद्दीमध्ये पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबलेले असता दोन कारमधून आलेल्या अज्ञात इसमांनी दोघांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविला. नितीन बन्सी गव्हाणे या ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण केले. दोन्ही वाहनांमधील सात अज्ञातांसह सरपंच शिवप्रसाद उबाळे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

अपहरणानंतर बुधवारी (दि.१०) सकाळी सव्वा आठ वाजता रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव राऊत यांनी सरपंचपद वाचविण्यासाठी शिवप्रसाद उबाळे याने दहशतीच्या बळावर गव्हाणे याचे अपहरण केल्याचा आरोप केला.

Web Title: fear of the revolver, Gr.Pt. kidnapping of a member Crime against Sarpanch

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here