Home महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज! औद्योगिक वसाहतीला आग, सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

ब्रेकिंग न्यूज! औद्योगिक वसाहतीला आग, सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

Breaking News | Fire: अग्नितांडव सहा कामगारांचा जळून मृत्यू.

Fire breaks out in industrial estate, six workers die

छत्रपती संभाजीनगर: वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर प्लॉट नंबर २१६ मध्ये ‘सनशाइन इंटरप्राईजेस’ कंपनीत रविवारी झालेल्या अग्नितांडवात सहा कामगारांचा जळून मृत्यू झाला. बिहार राज्यातील हे कामगार आहेत. रात्रीपासून पहाटेपर्यंत आग भडकतच होती.

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुश्ताक शेख (वय ६५), कौशर शेख (३२), इक्बाल शेख (१८), ककनजी (५५), रियाजभाई (३२), मरगुम शेख (३३) या अग्नितांडवात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. घाटीत दाखल केलेले मृतदेह स्थानिक माहितीनुसार,  वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर प्लॉट नंबर २१६ मध्ये साबिर शब्बीर शेख राहणार किराडपुरा यांची सनशाइन एंटरप्राइजेस नावाची कंपनी आहे. या कंपनीत हात मोजे बनवण्याचे काम चालते. या कंपनीमध्ये असमुद्दिन मुस्ताक शेख हे ठेकेदार आहेत. या सोबतच त्यांची पत्नी किस्मत परवीन शेख, मुलगा मोहम्मद मुजमीन शेख, मुलगी आयेशा शेख यांच्यासह १८ कामगार काम करत होते. यातील बहुतांश कामगार हे बिहार येथील असल्यामुळे ते कंपनीत काम करून तिथेच राहत होते.

दरम्यान, शनिवारी सायंकाळी कामातून सर्वजण जेवण करून झोपल्यानंतर रविवार दिनांक ३१ रोजी पहाटे साडेबारा वाजता कंपनीला भीषण आग लागली. यावेळी कंपनीत असलेले सर्वजण झोपलेले होते. आग लागल्याचे लक्षात येताच काही जणांनी कंपनीच्या बाहेर धाव घेतली. तर, यातील सहा जण कंपनीच्या आत अडक, दरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला.

या  घटनेची माहिती मिळतच अग्निशामक दलाचे दोन बंब व बजाज ऑटो व महानगरपालिकेचे दोन व चिखलठाणा अग्निशामक दलाचे असे एक असे एकूण सहा अग्निशामक दलाचे बंब वाळूज एमआयडीसीतील या कंपनीच्या समोर दाखल झाले दरम्यान न अग्निशामक दलाच्या अथक  प्रयत्नानंतर ही आग विझविण्यात  जवानांना यश आले.

Web Title: Fire breaks out in industrial estate, six workers die

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here